शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा देखील आर्थिक साक्षरता प्रवास – Chalk and Coins ची सुरुवात.
गेली 24 वर्षे शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना एक उणीव जाणवली सर्व काही पैसे कमवण्यासाठी चाललेले असताना पैशाविषयी/आर्थिक साक्षरता विषयी अर्थशास्त्र हा विषय सोडला तर एकही विषय शाळेत शिकवला जात नाही.
“शिक्षक” हा शब्द ऐकताच ज्ञान, शिस्त, सेवा आणि समर्पण या मूल्यांची आठवण होते. पण शिक्षक हे देखील सामान्य माणसासारखेच – कुटुंब, जबाबदाऱ्या, आणि आर्थिक अडचणी यांना सामोरे जातात. शिक्षण देताना आपल्या भविष्यासाठी शहाणपणाने आर्थिक निर्णय घेण्यासाठी आर्थिक साक्षरता तितकीच महत्त्वाची आहे.
हेही वाचा 👉आर्थिक साक्षरतेसाठी 13 महत्वाच्या गोष्टी

Chalk (शिक्षण) आणि Coins (आर्थिक ज्ञान) यांचा संगम म्हणजेच ‘Chalk and Coins’.
या ब्लॉगचा उद्देश:
- शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सरळ, सोपे आर्थिक लेखन.
- विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच आर्थिक साक्षरतेची बीजं पेरणे.

– शिक्षण क्षेत्रातील दैनंदिन अनुभव व त्यातील शहाणपण शेअर करणे.
– AI बद्दल माहिती देणे.

पहिल्या टप्प्यात काय येईल?
- पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग.
- विद्यार्थ्यांना ‘पैसा म्हणजे काय?’ हे कसे शिकवावे?
- पगारानंतरचे नियोजन
- शालेय जीवनात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त
👍